हृता दुर्गुळे अडकणार लग्नाच्या बेडीत ?

आपल्या मनमोहक हास्याने घायाळ करणाऱ्या हृता दुर्गुळे अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले. इंस्टाग्रामच्या स्टोरीवर पोस्ट केलेल्या एका फोटोवर टाकलेल्या हॅशटॅगमुळे हृता सध्या चर्चेत आहे. हृताने तिच्या प्रियकरासोबतचा म्हणजेच प्रतीक शाहसोबत एक फोटो शेअर करत #18daystogo असे हॅशटॅग दिले आहे. त्यामुळे हृता लवकरच प्रतीकसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

काही दिवसांपूर्वीच हृताने प्रतीकसोबतचा फोटो शेअर करत त्यांच्या नात्याविषयीची माहिती दिली होती. मात्र आता हृताने दिलेल्या हॅशटॅगमुळे तिच्या चाहत्यांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. आता १८ दिवसांचे हॅशटॅग देण्यामागचे कारण १८ दिवसांनंतर कळेलच. सध्या हृता व प्रतीकची जोडी सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्या दोघांची जोडी प्रेक्षकांना आवडल्याचे दिसून येते आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prateek Shah (@prateekshah1)

 

सध्या हृताची झी मराठीवर ‘मन उडु उडु झालं’ ही मालिका सुरु आहे. या मालिकेत हृता दीपू ही व्यक्तिरेखा साकारत आहे. या मालिकेतील इंद्रा-दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस ठरली आहे.

Leave a Reply