अभिनेता प्रसाद ओकची ‘ही’ पोस्ट चर्चेत
आपल्या अभिनयाने व दिग्दर्शनाने अनेक दर्जेदार सिनेमे देणारा प्रसाद ओक हा अभिनेता सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. प्रसादने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. संपूर्ण देशावर कोरोना नावाचं संकट आलं आणि त्यातून आपण सर्वच सावरत असतानाच कोरोनाच्या ओमायक्रॉनने पुन्हा सर्वांच्या चिंतेत भर घातली आहे.
View this post on Instagram
याच दहशतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या लोकांना प्रसादने एक संदेश दिला आहे. प्रसादने लाल रंगाच्या टीशर्टमधील फोटो पोस्ट केला आहे. त्याच्या या टीशर्टवर ‘लढ’ असे लिहिले आहे. ‘आता कोणताही व्हायरस आला, कशीही परिस्थिती आली तरी स्वतःला…कुटुंबाला आणि जवळच्या प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं… लढ!’ असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे. या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.