फ्रायडे रिलीज : या शुक्रवारी घ्या ‘पांडू’ व ‘पिरम’ सिनेमांचा आस्वाद

आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या भाऊ कदम व कुशल बद्रिके यांचा ‘पांडू’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सिनेमाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. पांडू व महादू या दोन मित्रांवर आधारित या सिनेमाची कथा आहे. साधाभोळा पांडू व चतुर महादूच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना अगदी मजेशीर पद्धतीने सिनेमात मांडण्यात आल्या आहेत.

या सिनेमात ‘पांडू’ व्यक्तिरेखा भाऊ कदम यांनी तर महादूची व्यक्तिरेखा कुशलने साकारली आहे. अवधूत गुप्ते यांनी संगीत दिलेल्या या सिनेमातील सर्वच गाणी लोकप्रिय झाले असून ‘केळेवाली’ या गीताने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हा सिनेमा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यश मिळवेल यात शंका नाही.

‘पांडू’सोबतच प्रदीप रंगराव लायकर दिग्दर्शित ‘पिरेम’ हा सिनेमासुद्धा ३ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. विश्वजित पाटील निर्मित या सिनेमाला संगीत रोहन-रोहन यांनी दिले आहे. प्रेमकथेवर आधारित हा सिनेमा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होईल अशी खात्री बाळगायला हरकत नाही.

तुम्हाला कोणता सिनेमा बघायला आवडेल आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा

Leave a Reply