झी मराठीवर लवकरच दाखल होणार एक ‘कुकरी शो’
झी मराठीवरील विविध विषयांवर आधारित असलेल्या मालिका व कार्यक्रम सादर होत असतात. अशा अनोख्या कल्पनांवर आधारलेल्या मालिका व कार्यक्रमांना प्रेक्षकांचे प्रेमही भरभरून मिळते. असाच एक वेगळ्या धाटणीची कल्पना असलेला कार्यक्रम लवकरच झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘किचन कल्लाकार’ असे या कार्यक्रमाचे नाव असून संकर्षण कऱ्हाडे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
या कार्यक्रमाचा टिझरही वाहिनी व सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. पडद्यावरील व पडद्यामागील कलाकारांचा या किचनमध्ये कस लागणार असून ते किचनमध्ये किती आणि कसा कल्ला करणार हे सुद्धा पाहणे रंजक ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या रुपरेषेविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.
अनेक नाटके, सिनेमा व मालिकांमधून झळकलेला संकर्षण त्याच्या उस्फुर्त निवेदनाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार हे मात्र नक्की!