‘मन उडु उडु झालं’ म्हणत हृता दुर्गुळेनेही दिली प्रेमाची कबुली 
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या हृताने तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या हृताने एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या पोस्टमुळे हृता सध्या चर्चेत आहे. हृताने तिच्या खास व्यक्तीसोबतचा फोटो शेअर करत तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta (@hruta12)

सिनेदिग्दर्शक व अभिनेता प्रतिक शाहसोबतचा एक सुंदर फोटो हृताने केला आहे. तिच्या या पोस्टनंतर सिनेक्षेत्रातील तसेच चाहत्यांनी कमेंटमध्ये शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ‘दुर्वा’ मालिकेतून हृताने मालिकाविश्वात पदार्पण केले. त्यानंतर ‘फुलपाखरू’ मालिकेने तिला खूप लोकप्रियता मिळवून दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta (@hruta12)

‘अनन्या’ या आगामी सिनेमातून हृता मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार असून सध्या ती झी मराठीवरील ‘मन उडु उडु’ मालिकेत दीपूची व्यक्तिरेखा साकारते आहे. तुम्हाला प्रतिक व हृताची जोडी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply