‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत लवकरच येणार एक नवा ट्विस्ट
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही सुरुवातीला प्रेक्षकपसंतीस उतरली होती. मात्र मध्यंतरीच्या काळात मालिकेत स्वीटू व मोहितचे लग्न दाखवण्यात आल्याने प्रेक्षक मालिकेवर नाराज झाले होते. मोहित-स्वीटूचे लग्न हा ट्रॅक प्रेक्षकांना मान्यच नव्हता. स्वीटू-ओमकारच्या प्रेमात प्रेक्षक इतके गुंतले आहेत कि त्या दोघांचं लग्न दाखवण्यात यावं अशी मागणी जोर धरू लागली.
त्याचाच परिणाम म्हणून लवकरच मालिकेत एक नवा ट्विस्ट येणार आहे. स्वीटू-मोहितच्या लग्नानंतरही स्वीटू ओमकारच्या घरात राहत होती. मात्र मालविकाला हे खटकल्याने तिने स्वीटूला मोहितच्या घरी जाण्यास भाग पाडलं. मोहितच्या घरी गेल्यावर त्याची आई छळ करते. त्यात मोहितचीही त्याच्या आईला साथ असते. हे सर्व ओमकारला असा ट्रॅक सध्या मालिकेत पाहायला मिळतोय. त्यामुळे लवकरच मोहित-स्वीटूचा घटस्फोट होणार असल्याचा ट्विस्ट आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहे.
या नव्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांना आनंद होणार आहे. मात्र घटस्फोटानंतर ओमकार-स्वीटूचे लग्न होईल का? की मालविका लग्नात अडथळे आणण्यासाठी पुन्हा कोणता नवा डाव आखेल? त्यातही मालविकाचे सत्य ओमकारसह सर्वांना समजले का? असे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांना छळत आहेत. मालिकेतील या नवीन रंजक वळणामुळे मालिकेला पुन्हा प्रेक्षकांची पसंतीस मिळेल यात शंका नाही.