मन उडु उडु झालं मालिकेतील ‘या’ कलाकाराचा थोडक्यात जीव बचावला

                     झी मराठीवर सध्या लोकप्रिय ठरत असलेली मालिका म्हणजे ‘मन उडु उडु झालं’ ही होय. या मालिकेत इंद्राची भूमिका साकारणाऱ्या अजिंक्य राऊतचा जीव थोडक्यात बचावला आहे. दिवाळीनिमित्त मूळगावी म्हणजेच परभणीला जात असतानाच अजिंक्यच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातातून अजिंक्य थोडक्यात बचावला आहे. या अपघाताबद्दलचा एक व्हिडीओ अजिंक्यने त्याच्या सोशल मीडियावर शेअर करत त्याच्या ओढवलेल्या संकटाविषयीची माहिती दिली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करत अजिंक्यने ‘तुम्हाला मिळालेला प्रत्येक दिवस फार कृतज्ञतेने जगा’ असे कॅप्शन दिले आहे. सुदैवाने अजिंक्य व त्याच्या मित्रांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. त्याने शेअर केलेला हा व्हिडीओ अपघातानंतरचा आहे. शुद्धीत आल्यावर त्याने हा व्हिडीओ चित्रित करून देवाचे व चाहत्यांचे आभार मानले आहेत. एका व्हिडीओच्या माध्यमातून अजिंक्य “आताच आमच्या गाडीचा अपघात झाला आहे. पण आता आम्ही ठीक आहोत. नशिबाने आमच्या गाडीचा वेग नियंत्रणात होता, म्हणून खूप भयावह असे काही घडले नाही. तसेच आजूबाजूला दरी असणारा रोड नव्हता. आमची गाडी स्केट झाली आणि ती ११०० व्होल्टच्या खांबावर आदळणार होती पण मित्राने ती आदळू नये यासाठी ती कंट्रोल केली. पण तरीही ती स्केट झाली. पण झाडीमुळे आम्ही वाचलो. देवाची कृपा म्हणजे त्याने आम्हाला झेललं. त्यामुळे मला यंदाची दिवाळी बघता आली. घराच्यांसाठी घेतलेले गिफ्ट्स मी अपघातानंतर जमा करत होतो. हे सर्व झाल्यानंतर कधीही काहीही संपू शकतं हे समजलं.” असे म्हणाला..

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajinkya Raut (@ajinkyathoughts)

“नमस्कार मी अजिंक्य राऊत, आपण सर्वांनी दिवाळी साजरी केली. वर्षातून एकदा दरवर्षी दिवाळीला मी परभणीला जातो. यंदाही मी जाताना रस्त्यात माझ्या गाडीचा अपघात झाला. सुदैवाने सर्वांच्या शुभेच्छांमुळे मी सुखरुप आहे.” असे त्याने सांगितले. “या अपघातानंतर एक गोष्टी नक्की शिकलो ती म्हणजे कोणतेही फेम, कोणताही पुरस्कार या कोणत्याही गोष्टी काहीही उपयोगाच्या नसतात, ज्यावेळी एखादा जीवघेणा प्रसंग समोर येतो. त्यातून मला देवाने वाचवलं. मी खरंच भाग्यवान आहे. या उरलेल्या आयुष्यात मला काही तरी चांगलं करता येईल, अशी माझी अपेक्षा आहे. स्वत:ची काळजी घ्या. कारण माझ्या लक्षात आले आहे की, सर्व काही एका सेकंदात सर्व काही संपू शकते. कोणताही चमत्कार होण्याची वाट पाहू नका. फक्त पुढे जा आणि तुमची स्वप्ने पूर्ण करा.” असेही तो म्हणाला.

अजिंक्यच्या ‘मन उडु उडु झालं’ मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. सध्या या मालिकेत दिवाळी सण साजरा करताना दाखवण्यात येत असून इंद्रालाही हळूहळू दीपूवरच्या प्रेमाची जाणीव होताना दिसते आहे.

Leave a Reply