सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘या’ कलाकाराचा झाला साखरपुडा
स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. जयदीप व गौरी यांच्या प्रेम कहाणीभोवती या मालिकेचे कथानक फिरते आहे. या मालिकेत उदय शिर्के पाटील ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या संजय पाटीलचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे.
संजयने इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट करत याविषयीची माहिती दिली आहे. अबोली गोखले असे संजयच्या होणाऱ्या पत्नीचे नाव असून त्याने तिच्यासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंसोबतच संजयने ‘माझे आयुष्य सुंदर करणारी तू परी आहेस, मनापासून तुझ्यावर जीव लावणाऱ्या या हृदयाची तू राणी आहे’ असे कॅप्शन दिले आहे. संजय व अबोलीचा साखरपुडा ५ नोव्हेंबर २०२१ रोजी पार पडला.
View this post on Instagram
अबोली ही एक वेलनेस ब्लॉगरसोबतच ती पोषणतज्ञ व योग सल्लागारही आहे. दरम्यान सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत लवकरच कबड्डीचा सामना पाहायला मिळणार आहे. शालिनीने घातलेल्या अटीनुसार तिच्याकडून शिर्के पाटलांची संपत्ती परत मिळवण्यासाठी जयदीप व गौरीसह संपूर्ण कुटुंबाने कंबर कसली आहे.
View this post on Instagram
येत्या १० नोव्हेंबरला हा कबड्डीचा सामना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता लागली आहे. तुम्हाला या मालिकेतील कोणती व्यक्तिरेखा आवडते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा