अग्गंबाई सासुबाई मालिकेतील ‘बबड्या’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
झी मराठीवरील ‘अग्गंबाई सासुबाई’ अल्पावधीत खूप लोकप्रिय झाली होती. घराघरात आसावरी-अभिजितच्या प्रेमाची व लग्नाची चर्चा रंगली होती. निवेदिता सराफ व डॉ. गिरीश ओक यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेत तेजश्री प्रधान व आशुतोष पत्की यांच्याही भूमिका होत्या. आसावरीच्या सूनेची म्हणजेच शुभ्राची व्यक्तिरेखा तेजश्रीने तर आशुतोषने आसावरीच्या मुलाची सोहमची उर्फ बबड्याची व्यक्तिरेखा साकारली होती.
आसावरी-अभिजितसोबत बबड्यालाही लोकप्रियता मिळाली. आशूतोषची ही पहिलीची मालिका असून प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांचा तो मुलगा आहे. या मालिकेनंतर आशुतोष कोणत्या नव्या मालिकेत पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती.
View this post on Instagram
आशुतोषने त्याच्या इंस्टाग्रामवर नुकतीच एक घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये त्याने आशुतोष पत्की एंटरटेनमेंट नावाच्या एका निर्मिती संस्थेची स्थापना केल्याचे सांगितले आहे. आशुतोषने “नमस्कार रसिक प्रेक्षकहो… दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या मुहूर्तावर मला तुम्हाला हे सांगायला आनंद होतोय की आज मी एका नवीन उपक्रमाची सुरुवात करतोय आशुतोष पत्की एंटरटेनमेंटच्या माध्यमातून तुमच्यासाठी काहीतरी छान कंटेन्ट आणण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्याचा “श्री गणेशा” दिवाळीच्या मुहूर्तावर होतोय.. तुमची साथ कायम असू द्या’
अशा आशयाची पोस्ट करत त्याच्या नव्या कामाविषयीची माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे. त्याच्या या पोस्टवर त्याच्या अनेक चाहत्यांनी व अनेक कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.