बिग बॉस मराठीमधील विकास पाटील या स्पर्धकाविषयी बरंच काही !

            बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातील स्पर्धक घरातील आपले स्थान सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रत्येक टास्क मेहनतीने पार पडताना दिसत आहेत. आज आम्ही तुम्हाला विकास पाटील या स्पर्धकाविषयी सांगणार आहोत.

विकास पाटीलचा जन्म २४ सप्टेंबर १९८२मध्ये कोल्हापूर येथे झाला. पुण्यातील एमएसएस हायस्कुलमधून त्याने त्याचे शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने फर्ग्युसन कॉलेजमधून बी.एस्सीमध्ये पदवी घेतली. अभिनयाची आवड असलेल्या विकासने लहानपणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला होता. कॉलेजमध्ये असताना त्याने अनेक एकांकिका स्पर्धेत भाग घेतला.

ईटीव्ही मराठीवरील ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. झी मराठीवरील ‘कुलवधू’ मालिकेतही त्याने एक छोटीशी भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने स्टार प्रवाहवरील ‘स्वप्नांच्या पलीकडले’ मालिकेत खलनायकी पात्र रंगवले होते.’लेक माझी लाडकी’ या स्टार प्रवाहवरीलच मालिकेत त्याने साकेतची व्यक्तिरेखा साकारली होती. ‘माझिया माहेरा’, ‘अधुरी एक कहाणी’, ‘सुवासिनी’, ‘आंतरपाट’ ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’,  ‘वर्तुळ’, ‘बायको अशी हव्वी’ अशा मालिकांमधून विकासने आपले अभिनय कौशल्य दाखवले होते.

 

२०१२मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुकाराम’ या सिनेमातून त्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. या सिनेमात त्याने ‘कान्हा’ ही भूमिका निभावली होती. त्यानंतर २०१५मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझ्या विन मरजावा’ सिनेमात त्याला नायकाचा रोल मिळाला होता आणि प्रार्थना बेहरे त्याची नायिका होती. या सिनेमात त्याने अनिकेत हे पात्र साकारले होते. शेंटिमेंटल’, ‘अंतरंगी’, ‘आजचा दिवस माझा’, ‘व्हॅकेशन’ ‘गोळाबेरीज’ अशा अनेक सिनेमांमध्येही त्याने काम केले आहे. मालिका, चित्रपटांसोबतच विकास ‘हमीदाबाईची कोठी’, ‘आलटून पालटून’, ‘थोडेसे लॉजिक थोडेसे मॅजिक’ अशा अनेक नाटकांमध्येही त्याने काम केले आहे.

Leave a Reply