स्टारवरील ‘या’ अभिनेत्रीने शेअर केली निराशावादी पोस्ट

                        स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय आई कुठे काय करते मालिकेने अल्पावधीच प्रेक्षकांची मने  जिंकली आहेत. या मालिकेत प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. संजना, अनिरुद्ध व अरुंधती या व्यक्तिरेखांभोवतीच मालिकेचे कथानक फिरते आहे. रुपाली भोसले हिने संजनाची व्यक्तिरेखा साकारली आहे. रुपाली भोसले हिचा घटस्फोट झाला असून तिला पहिल्या लग्नाच्या वेळेस अतिशय वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागले. आयुष्यात आलेल्या अनेक कठीण प्रसंगांवर मात करून तिने मराठी व हिंदी मनोरंजन क्षेत्रात स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे.

सध्या रुपाली उद्योगपती अंकित मगरे याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. त्याचसोबत एकमेकांना उद्देशून अनेक पोस्टही करत असतात.

मात्र रुपालीने सोशल मीडियावर एक निराशावाडी विचार असलेली पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टमुळे तिचे व अंकितचे ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरु आहे. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून रुपालीने अंकितसोबतचा एकही फोटो सोशल मीडियावर शेअर केला नसल्याने त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चेला आणखीच उधाण आलं आहे.

असे असले तरी रुपाली किंवा अंकित दोघांकडूनही या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. रुपाली हिंदी मालिकांसोबतच बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातही झळकली आहे. आई कुठे काय करते या मालिकेने रुपालीला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे.

 

Leave a Reply